हॉर्स शु खेकडा
कोरोना महामारीमुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त आहे. पूर्ण जगाच्या रथाची चाके जणू चिखलात रुतल्याप्रमाणे थांबली आहेत. विकासाचा तसेच कामकाजाच्या वेगात लक्षणीय घट झाली आहे. आज ४ ते ५ महिन्यानंतरही सर्वोत्तम आरोग्य सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या शेख्या मिरवणाऱ्या राष्ट्रांनासुद्धा आणि पर्यायाने (अतिप्रगत?) मानवजातीला या रोगापुढे हतबलता पत्करावी लागली आहे . एवढे असूनही ही आपत्ती निसर्गनिर्मित आहे कि मानवनिर्मित हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
अश्या या कुप्रसिद्ध कोरोनाच्या नायनाटाची धुरा एका खेकड्याच्या प्रजातीवर आहे हे सांगून सुद्धा कोणाला खरे वाटणार नाही. हो अगदी बरोबर वाचताय तुम्ही ..! हॉर्स शु प्रजातीच्या या खेकड्याला सध्या जगाच्या पाठीवर आरोग्य क्षेत्रात प्रचंड मागणी वाढली आहे. त्याला कारणही तसेच आहे...!
ज्याप्रकारे मागील काही वर्षांपासून स्वाईन फ्लू,इबोला , निपाह आणि आता कोरोना अश्या प्रकारे एका मागून एक रोग यायला सुरुवात झाली तेव्हापासूनच आरोग्य क्षेत्रातील उलाढाल आणि आर्थिक संधी यात प्रचंड वाढ झाली आहे. एखादा विषाणू आला रे आला कि, त्यावरील पहिली लस आपल्या संस्थेने किंवा आपल्या राष्ट्रानेच बनवली पाहिजे या चढाओढीत दररोज नवनवीन संशोधन आणि प्रयोग मोठया संख्येने होत आहेत. लसी तर बनवल्या जात आहेत परंतु त्या प्रभावी आहेत त्याने काही अपाय नाही याची विश्वासार्हता काय ? हा मोठा प्रश्न आहे. तर त्यावर उपाय आहे हॉर्स शु खेकड्याचे रक्त ..! या खेकड्याचे रक्त हे समुद्राच्या पाण्यासारखे निळे आहे व तेवढेच महाग देखील भारतीय बाजारात या रक्तासाठी तुम्हाला प्रतिलिटर ११ लाख रुपये मोजावे लागतील. लसीची चाचणी घेताना या रक्ताचा उपयोग केल्याने त्या लसीद्वारे दुसरे अपाय (साईड-इफेक्ट) होण्याचा धोका कमी असतो.
हॉर्स शु खेकड्याचे आरोग्य क्षेत्रातील अस्तित्व हे आज-कालचे नाही. १९५० साली फ्रेडरिक बँग (Frederick Bang) या वैज्ञानिकाने हा शोध लावला कि या खेकड्याच्या रक्तात अमिबासाईट (ameobocytes) नावाच्या विशेष पेशी असतात जे त्याचे बाहेरील विषाणू च्या आक्रमणांपासून रक्षण करतात. परंतु नंतर ७० च्या दशकात यावर विशेष संशोधन करण्यात आले आणि त्याद्वारे समोर आले कि या खेकड्याच्या रक्तापासून Limulus Amebocyte Lysate (LAL). हा पदार्थ तयार होतो ज्याद्वारे औषधातील विषारी घटकांचा शोध लावता येऊ शकतो कारण हा पदार्थ शरीरातील नवीन विषाणू लगेच ओळखून त्याभोवती एक जेलीसारखे आवरण तयार करतो. व त्या विषाणूला अपाय करण्यापासुन अवरोधित करतो. शरीरात दिल्यावर हा पदार्थ कोरोना विषाणू किंवा विषाणूबाधीत जागा शोधून या त्याच्या गुणधर्मामुळे काही कंपन्या या रक्तापासूनच लस तयार करण्यावर जोर देत आहेत. अवकाशात जाण्या अगोदर होणारी अंतराळवीराची रोगनिदान प्रक्रिया या पदार्थापासून करता येईल का यावर नासा संशोधन करत आहे.
हॉर्स-शू खेकड्याचे रक्त संकलन
दक्षिण अमेरिकेतील मेक्सिकोच्या पूर्व किनारपट्टीवर अटलांटिक सागरात हे खेकडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात; उन्हाळाच्या दिवसात हे प्रजननासाठी किनारपट्टीवर येतात ; सर्वात जास्त संख्येने ते पौर्णिमेला जेव्हा समुद्रात भरती असते तेव्हा येतात. याच काळात त्यांना लाखोंच्या संख्येने पकडून त्यांचे रक्त संकलन करण्यात येते. एक वयस्क खेकड्याच्या शरीरातील रक्तापैकी फक्त एक तृतीयांश म्हणजे ३० टक्के रक्त फक्त काढता येते त्याशिवाय जास्त रक्त काढले तर तो मरु शकतो.
हॉर्स-शु बाबत काही मनोरंजक गोष्टी.:-
- घोड्याच्या नाळे सारखा आकार असल्यामुळेच याना हॉर्स शु नाव पडले.
- एका संशोधनानुसार ही प्रजाती ४५ कोटी वर्षा पासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे. म्हणजे डायनोसॉर च्या २० कोटी वर्षाअगोदर पासून ते अस्तित्वात आहेत.
- मादी ही आकाराने नरापेक्षा मोठी असते.
- ह्याला खेकडा म्हटले जात असले तरी तो एक संधिपाद (arthopod ) आहे.
- ९ डोळे असल्यामुळे त्याची दृष्यशक्ती अतिशय तीक्ष्ण असते.
- मादी एका वेळेला १० ते २० हजार अंडी घालते.
- दिसायला जरी काटेरी असले तरी हे खेकडे हानिकारक नसतात .
- त्यांच्या रक्तात तांब्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांचे रक्त निळे दिसते.
horseshoe crab marathi ; marathi book marathi books online marathi ebooks marathi books pdf marathi sites marathi website pik vima online marathi stories marathi katha marathi kadambari free download mantra sangrah mayboli mayboli शेतकरी आत्महत्या माहिती सात बारा कसा शोधायचा pubg ban in india showik chakrabarty call of duty oppo f17 price india redmi 9a price in india
worldcup fifa
0 टिप्पण्या